माझे आवडते शिक्षक निबंध मराठी मध्ये Essay on My Favourite Teacher in Marathi

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी मध्ये Essay on My Favourite Teacher in Marathi: मित्रहो, शिक्षक हा आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचा असा  व्यक्ती असतो जो आपल्याला दैनंदिन जीवनातील बारीकश्या गोष्टींपासून अभ्यासापर्यंत प्रत्येक गोष्टीबद्दल शिकवत असतो.  आपल्या सर्वांना माहित आहे की आई ही मुलांच्या आयुष्यातील पहिली आणि सर्वोत्तम शिक्षिका असते. आई आपल्याला आपल्या आयुष्यात पहिलं पाऊल टाकायला शिकवते, पहिलं अक्षर किंवा पहिला शब्द बोलून, जगाची ओळख करून देते तसेच जगाशी सुद्धा ओळख करून देते.

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी मध्ये Essay on My Favourite Teacher in Marathi

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी मध्ये Essay on My Favourite Teacher in Marathi

पालकांनंतर शिक्षक ही सर्वात मौल्यवान व्यक्ती असते, जी विद्यार्थ्याचे जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये आपण आपल्या  अनेक शिक्षकांना भेटत असतो आणि त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची शिकवण्याची पद्धत, आणि बोलण्याची पद्धत, तसेच वागणूक, जीवनाबद्दलचे विचार, नैतिकतेच्या विविध कल्पना इत्यादींमुळे आपल्यालाही ते आवडत असतात.

आमच्यासारखे रडणारे अनेक विद्यार्थी असतात मात्र काही शिक्षक असे असतात जे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची काळजी घेऊन आम्हाला शाळेबद्दल आवड निर्माण करतात, त्यातले काही शिक्षक आम्हाला आवडले आणि मग आम्ही त्यांनी दिलेला शब्द, किंवा उपदेश , त्यांचे आदेश समजून पाळायला लागलो. नंतर, आम्ही हळू हळू मोठे झालो, शिक्षकांना आमच्या जीवनाचा गुरू मानू लागलो.

खरे पाहता, प्राथमिक शाळेतच सर्वोत्तम गुरू मिळणे ही जीवनातील एक आनंददायी गोष्ट आहे. परंतु मी म्हणेल की फक्त गुरू असणे हीच जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण सर्व शिक्षक हे चांगलेचा  असतात आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ते नेहमी चांगलेच काम करत असतात. कोणत्याच शिक्षकाला त्यांचा विद्यार्थी अपयशी व्हावा असे वाटत नाही. तुम्ही आयुष्यात यश मिळवावे आणि समाजात एक चांगला माणूस बनावे अशीच  प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते.

शिक्षक तुम्हाला जीवनातील चढ-उतारांची  ओळख करून देतात तसेच तुम्हाला चांगले-वाईट, योग्य-अयोग्य यातील फरक लक्षात घेऊन त्यावर विचार करण्यासाठी सक्षम बनवतात. शिक्षक हे  तुमच्या अभ्यासक्रमातील बरेच विषय शिकवत असतात, सोबतच व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त बनवायला शिकवतात  आणि जीवनात एक चांगला माणूस बनण्यासाठी आणि समाजात तुमचे नाव लौकिक  वाढवण्यासाठी तुम्हाला जीवनातील सर्वात महत्वाचे धडे देतात.

एक चांगला शिक्षक हा नेहमीच  एक चांगला मार्गदर्शक, चांगला तत्वज्ञ, मार्गदर्शक, विद्यार्थ्याचा मित्र असू शकतो. शिक्षकी पेशा एक हुशार आणि सुशिक्षित व्यक्तीचा पेशा आहे. जो त्यांच्या विद्यार्थ्यांना नवीन जीवनाचे धडे शिकण्यासाठी नेहमीच मदत करत असतो. शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांची अगदी त्यांच्या कुटुंबाप्रमाणे किंवा मुलांप्रमाणेच काळजी घेत असतात, त्यांना योग्य शिक्षण आणि समाजात चांगली वागणूक मिळावी यासाठी ते नेहमीच पुढे असतात.

शिक्षक आम्हाला आमच्या अभ्यासक्रमाशी संबंधित विविध भाषा तसेच आंतरराष्ट्रीय भाषा, जसे की इंग्रजी  शिकवतात. काही विद्यार्थी त्यांच्या आवडता विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना आवडते शिक्षक ठरवतात. तर काही विद्यार्थी शिक्षकांच्या वर्तनामुळे आणि  विचारांमुळे त्यांना आवडता शिक्षक म्हणून निवडतात.




About Author:

Amar Shinde is a writer and researcher specializing in the intersection of culture, technology, and society. In their free time, they enjoy playing chess.