माझी आजी निबंध मराठी मध्ये Essay on My Grandmother in Marathi: पांढरे झालेले केस, डोळ्यांवर चष्मा आणि हसरा चेहरा – ही आहे माझी आजी!
माझी आजी निबंध मराठी मध्ये Essay on My Grandmother in Marathi
माझी आजी दररोज पहाटे 5 वाजता उठते. देवाची आराधना आणि पूजापाठ करून ती फिरायला जाते. परत आल्यानंतर वर्तमानपत्र वाचते. जेव्हा ती मला शाळेत सोडण्यासाठी येते तेव्हा ती वाटेवर मला काही गोष्टी सांगत जाते.
माझी आजी एक समाजसेविका आहे. प्रत्येक दिवशी त्यांना अनेक लोक भेटायला येतात. आजी सतत सर्वांची मदत करते. रात्री ती खूप वेळ आमच्यासोबत घालवते. ती आमच्यासोबत कधी कधी खेळते देखील. घरातील कामांमध्ये देखील माझी आजी मदत करत असते.
आजी सर्वांवर प्रेम करते. कधी कधी ती आम्हाला आमच्या आवडीचे जेवण बनवून खाऊ देखील घालते. मी माझ्या आजी जवळच झोपते. आजी मला दररोज एक गोष्ट सांगते. मला माझी आजी खूप आवडते. माझ्या सर्व मित्रांना देखील माझी आजी खूप आवडते. ते देखील आजीची प्रशंसा करत असतात.