माझी बहिण निबंध मराठी मध्ये Essay on My Sister in Marathi: माझ्या बहिणीचे नाव रित आहे. ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. ती सध्या बालवाडी मध्ये शिकते. ती खूप गोड आहे. ती शांत, विनम्र आणि दयाळू आहे. आम्ही भरपूर वेळ हा एकमेकांसोबत घालवत असतो. आम्ही दोघे सोबत शाळेत जातो आणि सोबत डब्बा देखील खातो.
माझी बहिण निबंध मराठी मध्ये Essay on My Sister in Marathi
शाळा सुटल्यानतर आम्ही सायंकाळी सोबत क्रिकेट देखील खेळतो. त्यानंतर आम्ही सोबत कार्टून बघतो. मी तिच्यासाठी गोष्टीची पुस्तके वाचतो. ती खूप चपळ आहे. ती घरात सतत फिरत असते आणि प्रत्येकासोबत बोलत असते. तिला कवितांमध्ये बोलायला आवडते. तिला परिकथा आणि पौराणिक देवांच्या कथा ऐकायला आवडतात.
ती शाळेत होणाऱ्या कार्यक्रमात भाग घेते. तिने नृत्य, गायन आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेत देखील भाग घेतला होता. ती खूप जास्त हुशार आहे कारण ती लहान कविता, सोपी गाणी आणि काही प्रश्नांची उत्तरे सहज लक्षात ठेवते.
तिला प्रत्येकाची खूप काळजी असते. जेव्हा कधी मी आजारी असतो किंवा मला काही लागते तेव्हा ती रडायला लागते.
ती प्रत्येक सूचना पाळते. तिचे रूप सुंदर आहे. ती नेहमी निरोगी आणि आनंदी राहावी हीच माझी इच्छा आहे.